मुंबई : 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी बहुचर्चित 'साहो' चित्रपटासाठी चर्चेत आहे. प्रभाससोबत 'साहो'मधून अभिनेत्री श्रद्धा कपूरही स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक बाब उघड झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'साहो'ने प्रदर्शनापूर्वीच ३२० कोटी रुपयांची कमाई केल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर या अॅक्शन चित्रपटासाठीचे सॅटेलाईट राइट्स ३२० कोटींना विकले गेले आहेत. 



चित्रपटाचं शूटिंग देशाबाहेर आणि देशातील अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. 'साहो'तील अॅक्शन सीनसाठी जगभरातील मोठ-मोठ्या अॅक्शन कोरियोग्राफरची मदत घेण्यात आली आहे. 



 प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. 


सुजीथ दिग्दर्शित 'साहो' ३० ऑगस्टला तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.