मुंबई : अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री इंडस्ट्रीपासून लांब आहे. कारण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने केलेली प्लास्टिक सर्जरी. सिनेमांत जम बसण्याच्या काळात अधिक सुंदर दिसण्याच्या नादात मीनिषाने नाकावर प्लास्टिक सर्जरी केली. पण या प्लास्टिक सर्जरीने सुंदर दिसण्याऐवजी मीनिषाचा चेहरा बिघडला आणि पुढे तिला सिनेमा मिळणे बंद झाले. मात्र अजूनही मीनिषा लांबा प्लास्टिक सर्जरीची बाब मान्य करत नाही. 


कोणत्या मालिकेतून परतणार 


आता मीनिषा लांबा सब टीव्हीवरील 'तेनाली रामा' या मालिकेतून पदार्पण करणार आहे. 2014 मध्ये बिग बॉसच्या ८ व्या सीझनमध्ये मीनिषा दिसली होती. अर्थात स्पर्धक म्हणून तिचा या शोमधील प्रवास फार लवकर संपला होता. तेव्हापासून मीनिषा इंडस्ट्रीतून पुरती गायब झाली होती. 


मीनिषाने ‘कॉपोर्रेट’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियॉ’आदी चित्रपटांमध्ये काम केले. २००८ मध्ये  ‘बचना ए हसीनों’ या चित्रपटाने तिला ओळख दिली.