मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा नवीन चित्रपट 'बच्चन पांडे'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, 'बच्चन पांडे'च्या शूटिंग सेटला आग लागल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, या आगीत कोणीही जखमी झालं नाही ही दिलासादायक बाब आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शूटिंगदरम्यान लागली आग
'बच्चन पांडे' रिलीजच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मात्र, चित्रपटाचे काही पॅचवर्क बाकी होतं ज्यासाठी अक्षय कुमार आणि क्रिती सेनन शूटिंग करत होते. एका रिपोर्टनुसार, पॅच वर्कच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली. मात्र, कोणतीही मोठी हानी न होता आग तातडीने आटोक्यात आणण्यात आल्याची आनंदाची बाब आहे.



असा असणार अक्षय कुमारचा रोल
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बच्चन पांडे' या चित्रपटात अक्षय कुमार गँगस्टर बच्चन पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे, जो उत्तर प्रदेशचा आहे. त्याचबरोबर क्रिती सेनन पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  अक्षयला गँगस्टरच्या भूमिकेत पाहणे खूपच मजेशीर असणार आहे. यापूर्वी त्याने कृती सेननसोबत 'हाऊसफुल 4' या चित्रपटात काम केलं आहे. 4 मार्च, 2022 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.