बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी हिट ठरली अनुष्काची `परी`
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा `परी- नॉट ए फेरी टेल` हा सिनेमा होळीच्या मुहूर्तावर अखेर रिलीज झाला.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'परी- नॉट ए फेरी टेल' हा सिनेमा होळीच्या मुहूर्तावर अखेर रिलीज झाला.
या सिनेमात अनुष्का डबल रोलमध्ये आहे. हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आणि या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली.
या सिनेमाने पहिल्या दिवशी साधारण 4 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी आशा आहे.
परी हा सिनेमा भयपट आहे. मात्र या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर भयपट सिनेमासारखी याची स्टोरी नाहीये. या सिनेमातील भूत कोणत्याही प्रकारचा बदला घेत नाही.
सिनेमात अनुष्कावगळता प्रम्बरता चॅटर्जी आणि रजत कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमातील अनुष्काच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक केले जातेय.