मुंबई : भारताने कसोटीसोबत वन डे सीरिजही गमावली आहे. असं असताना फक्त क्रिकेट प्रेमिंनी नाही तर प्रत्येकाला एक गोड बातमी मिळाली आहे. या सामन्या दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका सर्वांसमोर आली. त्यामुळे सध्या सर्वत्र विरूष्काच्या लेकीची चर्चा आहे. लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना त्याचवेळी कॅमेऱ्यामनची नजर अनुष्कावर गेली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काच्या कडेवर लहान मुलगी दिसत आहे. ती वामिका असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. वामिकाचा पहिला फोटो समोर येताचं सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. 



लोक अनुष्का आणि वामिकाबद्दल ट्विटरवर ट्विट करत आहेत. कुणी म्हणतंय की आता कॅमेरामनला कायदेशीर नोटीस मिळेल, तर कुणी वामिकाला क्यूट म्हणत आहे. सध्या यावर अनुष्का-विराटची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 




आतापर्यंत विराट अनुष्का फोटोग्राफर्सना विनंती केली होती की,  वामिकाचे फोटो क्लिक करू नाका. अनेक फोटोग्राफर्सनीही विराट-अनुष्काची विनंती मान्य केली. लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना वामिकाला कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. 


त्यामुळेच यावेळी सर्वांना वामिकाची पहिली झलक पाहायला मिळाली. सध्या व्हायरल होत असेलल्या फोटोमध्ये वामिका अत्यंत गोड दिसत आहे.