मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'बिग बॉस 15' या शोची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉसच्या घरात रंगणारा स्पर्धेकांमधील वाद आणि खेळ यामुळे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होत. आता लवकरच हा शो सगळ्यांच्या भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या घराची पहिली झलक


'बिग बॉस 15'च्या आलिशान घराची पहिली झलक समोर आली आहे. यावेळी बिग बॉसचा शो हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 6 आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे


शोच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत ‘बिग बॉस 15’च्या घराची पहिली वहिली झलक सगळ्यांना दाखवली आहे. आत्ता फक्त काही दिवसांचीच प्रतीक्षा आहे.



आम्ही आरतीचं ताट घेऊन तयार आहोत, असं कॅप्शन देत बिग बॉसच्या हा नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.