`या` अभिनेत्री एकाचं व्यक्तीसोबत दोनदा अडकल्या विवाह बंधनात
टीव्ही विश्वातील अभिनेत्रींना एकाचं व्यक्तीसोबत का करावं लागलं दुसऱ्यांदा लग्न?
मुंबई : सध्या झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक जोडपी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह बंधनात अडकले. तर काही अभिनेत्रींनी एकाचं व्यक्तीसोबत दोनदा सप्तपदी घेतल्या. टीव्ही अभिनेत्री एकामागून एक लग्न करत आहेत. यातील अनेक अभिनेत्री अशा आहेत की त्या दुसऱ्यानंतर नववधू झाल्या आहेत. अशा अभिनेत्रींपैकी काही प्रसिद्ध अभिनेत्री...
पूजा बनर्जी (Puja Banerjee)
कुणाल वर्मा आणि पूजा बॅनर्जी यांनी 4 दिवसांपूर्वी बंगाली रितीरिवाजांसह लग्न केलं. आता कुणाल वर्मा आणि पूजा बॅनर्जी लग्नाच्या विधी पूर्ण करून मुंबईत पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नाला त्यांच्या 1 वर्षांच्या मुलानेही हजेरी लावली आहे.
प्रिया अहूजा (Priya Ahuja)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा पुन्हा सप्तपदी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री दिग्दर्शक पती मालव राजदासोबत पुन्हा लग्न करणार आहे.
नेहा कक्कर (Neha Kakkar)
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिनेही रोहनप्रीतसोबत दोनदा लग्न केलं आहे. नेहा कक्करच्या दोन्ही ब्राइडल लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
चारू असोपा (Charu Asopa)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चारू असोपाने राजीव सेनसोबत दोनदा लग्न केले. चारू असोपा आणि राजीव सेन यांनी यापूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर चारू असोपा आणि राजीव सेन त्यांनी गोव्यात लग्न केलं.
देबिना बनर्जी (Debina Bonnerjee)
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनीही दोनदा लग्नगाठ बांधली आहे. गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी 2006 मध्ये कोणालाही न सांगता लग्न केले. त्यानंतर गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी 2011 मध्ये संपूर्ण कुटुंबासमोर कोर्ट मॅरेज केले होते.