अभिनेत्रीचं टॉपलेस फोटो शेअर करत मोठं वक्तव्य, `या` गंभीर आजाराशी देतेय झुंज
बॉलिवूड अभिनेत्री फ्लोरा सैनी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फ्लोरा सैनी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण असं असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या अभिनेत्रीने भलेही आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली नसली तरी तिच्या बोल्डनेसने नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय फ्लोरा चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
फ्लोरा पुन्हा एकदा चर्चेत
ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करते. असंच काहीसं दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. फ्लोराने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून लोकांना थक्क केलं आहे. खरंतर यावेळी अभिनेत्रीने बोल्डनेस दाखवण्यासाठी तिचा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. पण यासोबतच ती भावूकही झाली आहे.
फ्लोरा या गंभीर आजाराशी झुंज देत आहे
फ्लोराने तिचा बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या गंभीर आजाराबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे. बर्याच वर्षांनंतर तिने चाहत्यांसमोर एक खुलासा केला आहे की, तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रासलं आहे, त्यामुळे तिला वजनाशी संबंधित समस्या आहेत. या आजारात वजन कमी होत नाही. मग तिला भूक लागली असेल किंवा जिमला गेली असेल.