मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा बागी २ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.


प्रमोशनसाठी रियालिटी शोमध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा आणि टायगर हे दोघेही उत्तम डान्सर आहेत. अशातच या दोघांनी डान्स रियालिटी शो मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर अहमद खान देखील उपस्थित होते.


कार्यक्रमाला रंगत आली


येथे दिशा-टायगर हे दोघे आपले कोरियोग्राफर अहमद खानसोबत थिरकताना दिसले. शोमध्ये या दोघांनी आपल्या मस्तीने चांगलीच रंगत आणली.


हे असतील शो चे परिक्षक


हाय फिव्हरः डान्स का नवा तेवर या रियालिटी शोमध्ये लारा दत्ता परिक्षक म्हणून भूमिका निभावणार आहे.तर याशिवाय बागी २ चे दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर अहमद खान देखील या डान्स रियालिटी शोचे परिक्षक असतील.