मुंबई : बॉलिवूडचे बहुतांशजण सलमानच्या अटकेमुळे दु:खी झाले आहेत. पण सोफिया हयातने सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर समाधान व्यक्त केलं आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट लिहत, 'शेवटी आपल्या कर्माचं फळ मिळालं.' असं म्हटलंय.


सोफियाला झाला आनंद 



बॉलीवुड दबंग सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.  काल शिक्षा सुनावल्यानंतर त्याची पहिली रात्र जोधपुर तुरुंगात गेली. शिक्षा सुनावल्यानंतर सलमानला मोठा धक्का बसला. सलमान अजुनही या धक्क्यातुन सावरू शकला नाही. त्याच्या परिवारासोबत संपुर्ण बॉलीवुड या दु:खात आहे. पण बॉलिवुडची अशीही एक अभिनेत्री जिला या शिक्षेमुळे आनंद झालाय. तिने इन्स्टाग्रामवर सलमान खानचा फोटो आणि पोस्ट शेअर केली. 'शेवटी आपल्या कर्माची फळ मिळतात. अनेकजण सलमान खानच्या विरोधात बोलायला घाबरतायत. सलमान विरोधात बोलल्यास इंडस्ट्रीमधे राहणं कठीणं होईल असं त्यांना वाटतयं. पण मी बोलायला घाबरत नाही. सलमानने जे काही केल त्यासाठी त्याला तुरूंगात जाव लागलं. पृथ्वीसाठी प्राणीदेखील महत्त्वाचे आहेत. पण सलमानने फक्त स्वत:चा विचार केला. असे तिने पोस्टमध्ये म्हटलयं.