चौथ्या दिवशी `दबंग-३`च्या कमाईचा वेग मंदावला
`दबंग ३` या चित्रपटाने आतापर्यंत कमवला इतका गल्ला
मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'दबंग ३' चित्रपट २० डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झाला. प्रदर्शनानंतर पहिले तीन दिवस चित्रपट सलग चढत्या क्रमावर होता. परंतु चौथ्या दिवशी मात्र चित्रपटाचा वेग मंदावला आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी 'दबंग ३'ने २४.५० कोटी, शनिवारी २४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारपर्यंत हे आकडे ४९.२५ कोटींवर पोहोचले.
तर सोमवारी चित्रपाटने फक्त १० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे आता येत्या काळात 'दबंग ३' किती कोटी रूपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली.
'दबंग ३' या चित्रपटाच्या निमित्ताने मनोरंजनाचा एक अफलातून नजराणा दिला. नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह सहकलाकारांच्या साथीने हा सलमान प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याविषयीच्या कमाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात होती.
मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकरने 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा यांचे आहे. तर आता ख्रिसमसच्या मुहूर्तावर 'दबंग ३' बॉक्स ऑफिसवर किती रूपयांचा गल्ला जमा करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.