`गोलमाल अगेन` २०० कोटींच्या क्लबमध्ये
अजय देवगणचा गोलमाल अगेन दिवाळीमध्ये रिलीज झाला होता.
मुंबई : अजय देवगणचा गोलमाल अगेन दिवाळीमध्ये रिलीज झाला होता. रिलीज झाल्याच्या ४ आठवड्यानंतरही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. गोलमाल अगेननं आत्तापर्यंत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चार आठवड्यांमध्ये गोलमाल अगेननं भारतात २०१.४३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
याचबरोबर गोलमाल यंदाच्या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. यंदा सलामान खान,आमिर खान, शाहरुख या तिघांनाही पिछाडीवर टाकत अजय देवगणने नवा विक्रम केला आहे. २०१७ मध्ये बाहुबलीनं ५११.३० कोटींची कमाई केली होती.
गोलमाल अगेन अजय देवगणचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. २० ऑक्टोबर रोजी 'गोलमाल अगेन' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. यामध्ये अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आहेत.
२०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
बाहुबली- ५११.३० कोटी रुपये
गोलमाल अगेन- २०१.४३ कोटी
जुडवा २- १३८ कोटी रुपये
रईस- १३७.५१ कोटी रुपये
टॉयलेट : एक प्रेम कथा- १३४.२५ कोटी रुपये
काबील- १२६.८५ कोटी रुपये
ट्यूबलाईट- १२१.२५ कोटी रुपये
लॉली एलएलबी 2- 117 कोटी रुपये
बद्रीनाथ की दुल्हनिया- ११६.६० कोटी रुपये
बादशाहो- ७८.०२ कोटी रुपये