Moushumi Chatterjee-Rekha Friendship day 2023 :  बॉलिवूडमध्ये जेवढ्या लव्ह स्टोरी आणि ब्रेकअपचे किस्से आहेत. तेवढंच इथे मैत्रीचेही अनेक नाती पाहिला मिळतात. घटस्फोटानंतरही आजही अनेक कलाकार एकमेकांचे जिगरी यार आहेत. पण सौदर्यांची खाण आणि 70 - 80 दशकातील अभिनेत्री रेखा आणि मौसमी चॅटर्जी या एकमेकांच्या सख्खा मैत्रीणी होत्या हे तुम्हाला माहिती आहे का? आज फ्रेंडशीप डे आहे त्यानिमित्ताने रेखा आणि मौसमी सख्या मैत्रिणी, पक्क्या वैरीणी कशा झाल्यात त्याबद्दल सांगणार आहोत. (Friendship Day 2023 best Friend rekha and moushumi chatterjee had a cat fight ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 - 80 दशकात या दोघींनी आपल्या अभिनय आणि सौदर्यांने चाहत्यांना वेड लावलं होतं. या दोघींच्या मैत्रीचेही अनेक किस्से या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण त्या एका व्यक्तीमुळे त्यांच्या नात्यात कडूता आली आणि त्यांचं नातं तुटलं. 


तेलुगू सिनेमातून कलाविश्वास पाऊल ठेवणारी रेखा आणि दुसऱ्या बाजूला लग्नानंतर फिल्मी दुनियेत आलेली मौसमी. दोघींनी एकशे एक भूमिका करत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या दोघींनी अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली. पण एका चित्रपटातून दोघींमध्ये वैर निर्माण झालं. 



मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता ज्याचं नाव होतं'भोलाभाला'. राजेश खन्ना, जगदीप, देवेन वर्मा यांसारख्या कलाकारांसोबत रेखा आणि मौसमी यात झळकल्या. या चित्रपटातील गाण्या त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजली होती. चाहत्यांना रेखा आणि मौसमी यांचा अभिनयही खूप आवडला होता. 



पण या चित्रपटाच्या वेळी दोघींमध्ये वाद झाला आणि त्यांची मैत्री कायमची तुटली. झालं असं की, या चित्रपटाच्या पोस्टरवर निर्मात्यांनी मौसमीपूर्वी रेखाचं नाव दिलं होतं. ही गोष्ट मौसमीला खटकी. त्यावेळी मौसमीने मीडियासमोर रागही व्यक्त केला होता. एवढंच नाही तर रेखाचं नाव तिच्यासमोरून काढून टाकावं म्हणून निर्मात्यांवर दबावही मौसमीने टाकला होता, असं मीडियारिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 



पण मीडियासमोर तिने या गोष्टींचं खंडन केलं आणि ''आपल्याला इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रसिद्धीची भूक नाही असं म्हटलं होतं. माझा माझ्या नावावर आणि कामावर विश्वास'' असल्याचंही ती त्यावेळी म्हणाली होती. विशेष म्हणजे हे म्हणतानाच त्या पुढे असंही म्हणाल्या होत्या की, ''जोपर्यंत कामाचा संबंध आहे. मला वाटतं मी मर्यादा ओलांडलेली नाही. तरीही त्यापूर्वी माझं नाव देणं आवश्यक आहे आणि त्यात काही नुकसानदेखील नाही.''