जयंती वाघदरे, झी मीडिया, मुंबई :  २०१३ साली आलेल्या फुकरे या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चागलाच गल्ला जमवला होता.. नवीन स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता याच सिनेमाचा सिक्वल फुकरे रिटर्न्स आज प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुकरे हा सिनेमा जिथे संपला तिथूनच फुकरे रिटर्न्स या सिनेमाची कहाणी सुरु होते. कसा आहे पुकरे रिटर्न्सहा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का, काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी, या सिनेमावर एक नजर टाकुया..


कलाकारांची भली मोठी फौज


रिचा चड्डा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, अली फजल, मनजोत सिंह अशी कलाकारांची भली मोठी फौज असलेला हा सिनेमा एक फुलटू टाईमपास सिनेमा आहे. एक वर्षानंतर पुन्हा चुचा अर्थातच वरुण शर्माला तशीच स्वप्न पडायला लागतात. या स्वप्नांच्या आधारे त्याचा मित्र हनी नेहमीप्रमाणे आपलं डोकं चालवून वेगवेगळ्या कहाण्या रचतो. या संपूर्ण प्रकरणात चुचा आणि हनीची साथ देतात लाली आणि जफर.. काही दिवसांनी भोली पंजाबन जेलमधून बाहेर पडते.. यांनंतर अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येतात.. पुढे काय घडते या साठी तुम्हाला फुकरे रिटर्न्सहा सिनेमा पहावा लागेल.. 


कथा चांगली मात्र पटकथा फसली


फुकरे रिटर्न्स या सिनेमाचा पूर्वार्ध चांगला झालाय. सिनेमाच्या सुरुवातीला फुकरे या प्रिक्वलची वन लाईन सांगितली जाते. अभिनेता वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि रिचा चड्डा या कलाकारांनी उत्तम काम केलंय. पण सिनेमा जसा पुढे सरकत जातो, तसातसा सिनेमाचा फ्लो डिस्टर्ब होतो.. सिनेमाची कथा जरी चांगली असेल, तरी पटकथा फसलीये. 


किती स्टार्स


जवळपास ३० कोटीच्या बजेटमध्ये बनलेला फुकरे रिटर्न्स हा सिनेमा १२०० पेक्षा अधिक स्क्रिन्सवर प्रदर्शित होतोय. फुकरे रिटर्न्स एक टाईमपास सिनेमा आहे पण फुकरे या आधीच्या सिनेमाच्या तुलनेत फिका पडतो.. सिनेमातील हे सगळे फॅक्टर्स पाहता फुकरे रिटर्न्स या सिनेमाला मिळतायत 2.5 स्टार्स..