Gadar 2 Rumi Khan : सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे आणि तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर' 2'. 'गदर' 2' प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला केला आहे. एकीकडे चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षक स्तुती करत असताना दुसरीकडे अभिनेता रुमी खानची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. रुमी खाननं या चित्रपटात पाकिस्तानच्या एका ऑफिसरची भूमिका साकारली होती. चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी गेल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या भोवती गद्री केले. तो कसा बसा चित्रपटगृहातून बाहेर पडला पण प्रेक्षकांनी त्याच्या गाडीची तोडफोड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईटाइम्सला एका सोर्सनं दिलेल्या माहितीनुसार, रुमी खान जेव्हा मध्ये प्रदेशमध्ये असलेल्या त्याच्या गावी गेला होता. तेव्हा तो तिथे 'गदर 2' हा चित्रपट पाहण्यासाठी गेला. तिथे आधीच प्रेक्षकांची गर्दी होती. रुमी खानला पाहताच त्या प्रेक्षकांनी त्याच्या आजूबाजुला गर्दी केली आणि त्याला तिथून जाऊ देत नव्हते. चित्रपट पाहिल्यानंतर रुमी खान कसा तरी चित्रपटगृहातून बाहेर पडला. पण जेव्हा तो त्याच्या गाडीत बसला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या गाडीची काच फोडण्यास सुरुवात केली. रुमी खान तिथून कसा बसा बाहेर तर पडला पण त्याच्या गाडीवर अनेक ठिकाणी स्क्रॅच होते. जेव्हा रुमीला याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यानं ही खूप भयानक घटना होती असं म्हटलं. 



यावेळी रुमी म्हणाला, 'हे खूप भयानक होतं. मला वाटतं की प्रेक्षक हे त्यांना चित्रपटाशी जोडून घेतात आणि त्यावर त्याची प्रतिक्रिया देतात. मी चित्रपटात एका खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि त्यांनी मला खऱ्या आयुष्यात देखील खलनायक असल्याचे समजले. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की अजूनही प्रेक्षकांना हे कळंत नाही की आम्ही अभिनय करतो आणि ती एक भूमिका असते. मी या आधी देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. मी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. चाहते माझ्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी यायचे आणि तेव्हा ते खूप जवळ येण्याचा प्रयत्न करायचे. मी त्यांच्या प्रेमाचा आदर करतो आणि त्यांना फोटो क्लिक करण्यासाठी हो बोलतो.'


हेही वाचा : 'मराठी कलाकारांसोबत काम करायचं म्हणजे...', सुष्मिता सेनचं वक्तव्य चर्चेत


रुमी पुढे म्हणाला की, 'यावेळी हे थोडं वेगळं होतं मी या गोष्टीच्या विचारात अडकलो होतो की हे प्रेम आहे की द्वेष? काही लोकांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांनी नकारात्मक रिअॅक्शन दाखवली. जसं की मी खराच खलनायक आहे. जो पाकिस्तानातून इथे भारतात आला आहे. मला या  घटनेविषयी समजतच नव्हतं की हे काय होतंय. मी माझ्या गाडीपर्यंत येण्यात यशस्वी झालो आणि ते लोक माझ्यामागे धावत होते. मला या गोष्टीची चिंता होती की कोणाला दुखापत नाही झाली पाहिजे. देवाच्या कृपेनं माझ्या गाडीला सोडून सगळे ठीक आहेत. मी घरी आल्यावर पाहिलं की माझी गाडी डॅमेज झाली आहे आणि त्यावर स्क्रॅच आले आहेत.'