Gadar 2 Oscar Anil Sharma: Gadar 2 हा चित्रपट सध्या सर्वत्रच लोकप्रिय होतो आहे. या चित्रपटानं गेल्या काही दिवसांमध्येच 500 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. यावेळी या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात गाजतो आहे. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मात्र एक वेगळीच खंत व्यक्त केली आहे. परंतु त्यांना Gadar 2 हा चित्रपट आता ऑस्करपर्यंत पोहचवायचा असून त्याबद्दल त्यांनी नुकतीच एका मुलाखतीतून माहिती दिली आहे. 2001 साली आलेल्या Gadar 2 या चित्रपटानं तेव्हा सर्वत्र धुमाकूळ घातला होता. त्यातून या चित्रपटाच्या कथेमुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. एवढंच नाही तर सनी देओल, अमीषा पटेल, अमरीश पुरी यांच्या अभिनयाचेही सर्वच जण फॅन्स झाले होते. अमीषा पटेल आणि सनी देओलची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता 22 वर्षांनीही या दोघांची केमेस्ट्री ही कायमच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अनिल शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. ज्यात त्यांनी Gadar 2 ला ऑस्करला नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ते म्हणाले की, ''मला लोकं हे वारंवार सांगत आहेत की हा चित्रपट तुम्ही ऑस्करला घेऊ जा. 'गदर' हा 2001 साली आलेला चित्रपट काही ऑस्करला जाऊ शकला नाही. मला माहिती नाही की तो का नाही गेला. त्यातून हा चित्रपट म्हणजेच Gadar 2 जाईल की नाही याचीही काहीच शाश्वती नाही. पण आम्ही याच्या प्रक्रियेत आहोत. पण Gadar 2 हा चित्रपट जायलाच हवा आहे. ऑस्करसाठी Gadar 2 हा चित्रपट योग्य ठरेल. 1947 च्या फाळणीवर हा चित्रपट आधारित आहे. आम्ही हीच कथा दोन वेगवेगळ्या रूपात मांडायचा प्रयत्न केला आहे. दोन्ही चित्रपट हे मुळ कथांवर आधारलेले आहेत.'', असे त्यांचे मतं आहे. 


हेही वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं वयाच्या 31 व्या वर्षी निधन, शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल


गेल्या चाळीस वर्षांची नाराजी...


सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनिल शर्मा यांच्या एका वक्तव्याची. ते म्हणाले की, '' गेल्या काही वर्षांपासून मी नाराज आहे. मी गेली 40 वर्षे या क्षेत्रात आहे परंतु मला अद्याप एकही पुरस्कार मिळालेला नाही. माझ्या कामाची प्रशंसाही झालेली नाही. मला असं वाटतं की मी या क्षेत्रात कामच केलेलं नाही. मला माहिती नाही की पुरस्कार देण्यासाठी तिथे कोण बसलेले असतात परंतु मला तरी अद्याप एकही पुरस्कार प्राप्त झालेला नाही. मला आठवतं की, धर्मेंद्र एकदा म्हणाले होते की, ते पुरस्कार घेण्यासाठी कसे सुटाबुटात जायचे, त्याचसोबत ते नवीन टायही परिधान करायचे. कारण त्यांची इच्छा होती की त्यांनाही पुरस्कार मिळेल परंतु त्यांना तो काही मिळायचा नाही.''


''मला असं वाटतं नाही की मी चित्रपटसृष्टीचा हिस्सा आहे. आमच्यासोबत हे असंच घडलं आहे. आम्हाला आत्तापर्यंत एकही पुरस्कार मिळालेला नाही परंतु आम्ही खुश आहोत. कारण आम्हाला लोकांच्या प्रेमाचा पुरस्कार वारंवार मिळाला आहे. आम्ही Gadar 2 च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या हृदयात पोहचलो आहोत. मी खोटं बोलणार नाही. परंतु आम्हालाही पुरस्कार हवे आहेत. मला माहिती आहे की मला मिळणार नाही. मला कल्पना आहे की यामागे खुप मोठी यंत्रणा आहे. मला काही राजकारणीही नाही. मी काही पुरस्कार मिळवण्यासाठी PR ही करत नाही.'', असंही ते म्हणाले आहेत.