Gadar 2 weekend collection: अभिनेता सनी देओल (Sunny deol) आणि अमीषा पटेल यांचा गदर -2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिना प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर उचलून घेतला आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट कमाईच्या बाबतीत इतर चित्रपटांना टक्कर देतोय. अवघ्या 9 दिवसांत हा गदर -2 सिनेमा (Gadar 2) ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरला आहे. तर दुसऱ्या विकेंडमध्ये सिनेमाने धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं. त्याचबरोबर गदर 2 सिनेमाने इतिहास देखील रचला आहे. 


 गदर 2 ने रेकॉर्ड तोडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गदर 2 सिनेमाने इतिहासातील कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी सर्वात जास्त दुसऱ्या वीकेंड कलेक्शनची (Weekend Collection) नोंद केली आहे. चित्रपटाने बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले आहेत. दुसऱ्या वीकेंडमध्ये म्हणजेच शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात 90.47 कोटी रुपये कमावले आहेत. बाहुबली 2 च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या वीकेंडमध्ये 80.75 कोटी कमावले होते, तर 'दंगल' सिनेमाने दुसऱ्या वीकेंडमध्ये 73.70 कोटी कमावले होते. तर प्रभासच्या बाहुबली 2 ने त्याच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये 80.75 कोटी कमवून भारतात इतिहास रचला होता.


रविवारी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी गदर 2 सिनेमाने 41 कोटींहून अधिक कलेक्शन करून खळबळ उडवून दिलीये. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने 10 दिवसांत जगभरात 375 कोटी रुपये कमावले आहेत. फक्त 8 दिवसांत 300 कोटींचा टप्पा ओलांडणारा 'गदर 2' आता बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट 'पठाण'ला थेट टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.


आणखी वाचा - सनी देओलच्या बंगल्याचा होणार नाही लिलाव, बँक ऑफ बडोदाने या कारणासाठी नोटीस घेतली मागे


दरम्यान, 'पठाण' हा आतापर्यंतचा सर्वात जलद 400 कोटी क्लबमध्ये पोहोचणारा चित्रपट आहे. अवघ्या 12 दिवसांत हा टप्पा पार केला. 'बाहुबली 2' (हिंदी) ला 400 कोटी कमवायला 15 दिवस लागले आणि यशच्या 'KGF 2' ला ही कामगिरी करायला 23 दिवस लागले. त्यामुळे जर सोमवारी गदर 2 ला 25 कोटींची कमाई करता आली तर सर्वात जलद 400 कोटी कमावणारा चित्रपट हा गदर 2 असणार आहे. सिनेमाच्या पाचव्या दिवशी 55.40 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता सिनेमा यश मिळवताना दिसत आहे.