मुंबई : सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला पोहोचला आणि एका मंगलपर्वाला सुरुवात झाली. काही दिवसांपासून लगबग सुरु असणाऱ्या या वातावरणाला सर्वाधिक उत्साही आणि कुतूहलपूर्ण अशा पद्धतीने साजरा करत प्रत्येकानेच गणरायाचरणी आपली सेवा अर्पण केली. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. याचीच प्रचिती आली ती म्हणजे अंबानी कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका खास समारंभात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपतचीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि या बुद्धीदेवतेची उपासना करण्यासाठी म्हणून कला, क्रीडा आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी मुकेश अंबानी यांच्या एँटिलाया या निवासस्थानी हजेरी लावली. 


अंबानींच्या घरी हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून गेली ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची जोडी. सध्याच्या घ़डीला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी पारंपरिक आणि आधुकनिकतेची सांगड घालत साकारण्यात आलेल्या सुरेख अशा वेशभूषेत यावेळी सर्वांची मनं जिंकून गेली. आलिया आणि रणबीरशिवाय त्यांच्या आगामी चित्रपटाचा म्हणजेच 'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जी याचीही यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. 








इलियाना डिक्रूझ, आमिर खान यांच्यासोबतच 'झक्कास' अभिनेता अनिल कपूरही या उत्सवाच्या निमित्ताने पत्नीसह या ठिकाणी पोहोचला होता. तर, 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित, पतीसह अंबानीतर्फे आयोजित या समारंभासाठी पोहोचली होती. फक्त बी- टाऊन सेलिब्रिटीच नव्हे, तर क्रीडा विश्वातूनही अनेक चेहरे यावेळी दिसले. ज्यामध्ये सचिन तेंडुलर, हरभजन सिंग, हार्दीक पांड्या, पार्थिव पटेल, अजित आगरकर, युवराज सिंग यांचा समावेश होता.