मुंबई: गुरुग्रामच्या एसटीएफ टीमने दिलेली धक्कादायक माहिती पाहून बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली आहे. बॉलिवुड अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असे एसटीएफच्या टीमने म्हटले आहे. हैदराबाद येथील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपत नेहरा याला गुरूग्रामच्या एसटीएफच्या टीमने अटक केली आहे. या अटकेनंतर केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली.


सलमानच्या घराची रेकी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपत नेहरा यांने मे महिन्यामध्ये सलमानच्या घराची रेकी केली होती. कट्टर चाहता असल्याचे भासवत सलमानला भेटायचे आणि त्याची हत्या करायची, असा तो कट होता. नेहराने सलमानच्या वांद्रे येथील घराची दोन दिवस रेकी केली. रेकीदरम्यान सलमान घरातून केव्हा बाहेर येतो. तो बाहेर आल्यावर त्याचे सुरक्षा रक्षक काय करतात. सुरक्षेवेळी साधारण किती लोक कार्यरत असतात. घराबाहेर किंवा घराच्या आवारात फारशी गर्दी असते का, आदी गोष्टींचा नेहराने अभ्यास केला होता, अशी माहिती एटीएसने केलेल्या सखोल चौकशीत पुढे आली होती.


सलमानला जीवे मारण्याची धमकी


दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला काळवीट शिकार प्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही धमकी मिळताच तातडीने पावले उचलत लॉरेन्सचा खास असलेल्या संपत नेहराला एसटीएफने अटक केली. दरम्यान, सध्या कटाची माहिती पुढे आली आहे. मात्र, या कटात एकूण किती लोक सहभागी आहेत. ते लोक कोण आहेत, याबाबत एसटीएफने सखोल तपास सुरू केला आहे. सखोल चौकशीत आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.


तुरूंगातून रचला सलमानच्या हत्येचा कट


सलमान खानच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच रचला होता. हत्येची जबाबदारी संपत नेहराकडे सोबवण्यात आली होती. नेहरा आणि बिश्नोई यांची ओळखही तुरूंगातच झाली. या ओळीचा परिणाम म्हणजे तुरूंगातून बाहेर आल्यावर संपत नेहरा बिश्नोहीच्या गँगमध्ये सहभागी झाला. २०१६मध्ये एका कार चोरी प्रकरणात संपत नेहराला अटक झाली होती. त्यानंतर नेहरा आणि बिश्नोई यांच्यात हातमिळवणी झाली.