मुंबई : गंगूबाई यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर इतर महिलांच्या हक्कांसाठी देखील लढा दिला... गंगूबाई यांनी वेश्या व्यवसाय करण्याऱ्या महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या, त्यांच्या मुलांसाठी अनेकांसोबत लढणाऱ्या गंगूबाई.... त्यांची कथा म्हणजे 'गंगूबाई काठियावाडी...' सध्या सिनेमाची सर्वत्र चर्चा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे आलियाने मोठ्या पडद्यावर साकारलेल्या गंगूबाई भूमिकासाठी तिचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया सर्वत्र सिनेमाच्या सिग्नेचर स्टेपने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आलिया सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान तिचा बसमधून सिनेमाचं प्रमोशन करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती सर्वांना गंगूबाईच्या स्टाईलने नमस्ते करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. 


सध्या सर्वत्र आलियाच्या गंगूबाई काठियावाडी सिनेमाचा बोलबाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन संजल लिला भंसाळी यांनी केलं आहे. सिनेमात अनेक भावूक क्षण आहेत... वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचं आयुष्य... त्यांच्या आयुष्यात येणारी संकटं... ऐकाव्या लागणाऱ्या शिव्या... कुटुंबातील सदस्य कधीही दिसत नसल्याचं दुःख... या सर्व गोष्टी दिग्दर्शकाने उत्तम रित्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.