Gashmeer Mahajani : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी हा गेल्या काही काळापासून त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. गश्मीरचे वडील म्हणजेच अभिनेता रवींद्र महाजनी यांचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबी गाव परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला. तब्बल दोन दिवस त्यांचा मृतदेह हा त्या खोलीत होता. सोसायटीत दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यावेळी दार आतून बंद असताना असं काय झालं हा प्रश्न अनेकांना होता. दरवाजा तोडल्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह तिथे सापडला. त्यांच्या निधनानंतर सगळ्यांसमोर एकच प्रश्न उपस्थित झाला होता. तो म्हणजे त्यांच्या निधनाविषयी ना त्याची पत्नी, मुलगा किंवा मुलगी कोणालाही कसं माहित नाही. दोन दिवस रवींद्र यांच्याशी त्यांनी संपर्क केला नाही का? किंवा मग कुटुंबात काही मतभेद होते का त्यामुळे हा प्रकार घडला की काय... त्यांच्या निधनानंतर मात्र, गश्मीर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर टीका करण्यात येत होती. आता गश्मीरनं नुकतीच एक मुलाखत दिली असून संपूर्ण घटना सांगत. पोलिसांनी काय सांगितले याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत गश्मीरनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. रवींद्र यांच्या निधनानंतर सगळ्यांसमोर आणखी एक प्रश्न उपस्थित झाला होता. तो म्हणजे त्यांच्या निधनाचे कारण काय? कारण रवींद्र यांच्या शरीरावर एक जखम देखील नव्हती. मग त्यांच्या निधनाचे कारण काय... तर त्याविषयी सांगत गश्मीर म्हणाला की रवींद्र महाजनी यांचा मृत्यू कार्डियक अरेस्टनं झाला. तुम्ही समोर असला असता तरी त्यांचे प्राण वाचवता आले नसते अशी माहिती त्याला पोलिसांनी दिली. 



रवींद्र महाजनी यांच्याविषयी बोलायचे झाले तर गेल्या 20 वर्षांपासून ते कुटुंबियांपासून लांब राहत होते. त्यांनी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचे फोन नंबर हे ब्लॉक केले होते. ते पुण्यातील एका फ्लॅटमध्ये राहत होते. तर तीन वर्षांपासून त्यांचा संपूर्ण कुटुंबाशी काहीही संवाद नव्हता. त्यांना कुणाचीही मदत घ्यायला आवडत नव्हतं. स्वयंपाकही ते स्वत: करायचे. त्यांच्या इथे कामाला असणाऱ्या लोकांना दुसऱ्याच दिवशी ते पळवून लावायचे. स्वत: च्या संरक्षणासाठी त्यांच्याकडे बंदूक देखील होती. 


हेही वाचा : माझी चूक आहे; लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत: ला का जबाबदार ठरवतात नीना गुप्ता?


रवींद्र महाजनी यांच्या विषयी बोलायते झाले तर ते हॅन्डसम अभिनेता म्हणून ओळखले जायचे. सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे 'ते राजासारखं आयुष्य जगले आणि त्यांना कुणालागी त्रास न देता सगळा त्रास सहन करत त्यांना मरण आले. आपण म्हणतो की, असं मरण यावं. तसं ते गेले', असं गश्मीर यावेळी म्हणाला.