मुंबई : अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) चित्रपटांमुळे नाही तर ती कायम इन्स्टाग्रामवरील रिल्समुळे चर्चेत असते. रिल्सच्या माध्यमातून  गौह आयुष्यातील अडचणी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील गौहरने एक रिल सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा नवा अंदाज फक्त मुलींनाचं नाहीतर मुलांना देखील आवडला आहे. आता पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने मास्कमुळे लिपस्टिप खराब होत असल्याची तक्रार केली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती तयार होत आहे. मोठ्या आनंदात ती आवडत्या शेडची लिपस्टिक लावताना दिसत आहे. पण मास्क बंधनकारक असल्यामुळे तिचे लिपस्टिक खराब होते आणि तिला राग येतो. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'महिलांनो तुम्हाला का असं वाटतं मी असं करते? महामारी जीवनात तुमच्याकडे किती लिपस्टिक आहेत? तुम्ही माझ्याकडे असलेल्या लिपस्टिकचा अंदाज लावू शकता.' असं लिहिलं आहे.