जान कुमार सानूच्या समर्थनात धावली गौहर खान
तिने जान सानुच्या समर्थनार्थ पोस्ट केली
मुंबई : 'बिग बॉस १४'च्या घरात मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या जान कुमार सानूवर राज्यभरातून टीका झाली. त्यानंतर वाहीनीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे माफी मागण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जान सानूने देखील बिग बॉस आणि प्रेक्षकांची माफी मागितली. त्यानंतर आता जान सानूच्या प्रत्येक बोलण्याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. बिग बॉसच्या घरात जान सानू करत असलेल्या चर्चा आणि वादात तो काय बोलतो हे प्रत्येकजण पाहतोय. यामध्ये काही त्याला विरोध करतायत तर काहीजण त्याच्या समर्थनार्थ उतरतायत. अशाच एका प्रसंगात बिग बॉसच्या घरात सिनिअर स्पर्धक म्हणून गेलेली गौहर खान जान सानूच्या समर्थनार्थ धावली आहे. तिने जान सानुच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.
राहुल वैद्य आणि जान सानुच्या झालेल्या वादात राहुलने जान सानुवर नेमोटीझ्मचा आरोप केला. यावर गौहर सोशल मीडियात व्यक्त झाली आहे. नेपोटीझ्मचा आरोप करण हे हल्ली सोपं झालंय. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले जाते.
जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा की तू घरात कुमार सानू यांचा मुलगा म्हणून आलायस. ही काळजी करण्याची करण्याची गरज नाही. तू खुष राहा असे ती म्हणाली.
या पोस्टनंतर नेटकरी जान सानूबद्दल गौहर खानला अनेक प्रश्न विचारत आहेत. पण ती त्यावर बोलणं टाळत आहेत. मंगळवारच्या एपिसोडमध्ये जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरला होता.
जान कुमार सानू याचे वडील, आघाडीचे गायक कुमार सानू यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार प्रताप सरनाईक यांची जाहीर माफ मागितली आहे. इतकच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र, बाळासाहेब यांच्याशी त्यांच्या असलेल्या संबंधांना उजाळा देत आम्ही जे काही आहोत ते या महाराष्ट्र आणि मराठी मातीमुळे आहोत अशी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मुलाकडून झालेल्या मराठी भाषेच्या अवमाना बद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
बिग बॉसमधील १४ व्या सीझनचा स्पर्धक जान कुमार सानू याला मनसेपाठोपाठ आता शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी आपण शिवसेना स्टाईल दाखवू असा इशारा दिला होता. घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने,'मला मराठीची चीड येते', असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केला आहे., मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला.