मुंबई : टीव्ही अभिनेत्री गौहर खानने तिची आई आजारी असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून हॉस्पिटलमध्ये 9 दिवस घालवण्याचा तिचा अनुभव शेअर केला. गौहरने इंस्टाग्रामवर एक मजेदार रील व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या आजारी आईसोबत दिसत आहे. गौहरने सांगितलं की, तिने हॉस्पिटलमध्ये घालवलेले दिवस तिला झोम्बीसारखे वाटत होते, परंतु तिच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा पाहून तिला चांगलं वाटतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये गौहर खूपच कॅज्युअल अवतारात दिसत आहे. गौहरने सांगितलं की, ती गेल्या 9 दिवसांपासून तिच्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती झोपतदेखील नाही आणि आरामही करत नाही. तिला 'झोम्बी' असल्यासारखं वाटत आहे. अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं की, "सर्व प्रार्थना करणाऱ्यांसाठी धन्यवाद." व्हिडिओमध्ये, गौहर आणि तिची आई दोघांनीही काही डान्स मूव्ह दाखवून चाहत्यांना आनंद दिला. गौहरने सांगितलं की, आईच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून शेवटी आपण घरी जाऊ शकू असं वाटतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओवर गौहरच्या सहकलाकारांनी आणि जवळच्या मित्रांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनीही अभिनेत्री आणि तिच्या आईला शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने कमेंट केली की, "मला आशा आहे की, ती आता चांगली आहे आणि आशा आहे की, तुम्ही लोकं लवकरच घरी जाल" तर दुसर्‍या चाहत्याने कमेंट केली की, "तुम्हाला आनंदी पाहून आनंद झाला"