धर्माची खिल्ली उडवल्यानं राखीवर भडकली गौहर खान म्हणाली, `अबाया परिधान केल्यानं...`
Gauahar Khan Rakhi Sawant : गौहर खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राखीचं नाव न घेता तिनं केलेल्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.
Gauahar Khan : गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत ही सोशल मीडियावर पती आदिल खानमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्या दोघांच्या चर्चा या संपेनाशा झाल्या आहेत. राखीनं तिचा धर्म बदलला असून ती आता मुस्लिम झाली आहे. तर आदिलनं या सगळ्याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे आणि सांगितलं की राखीनं त्याला फसवलं आहे. दुसरीकडे राखीनं उमरा करत इस्लामवर असलेलं तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यानंतर तिनं अबाया परिधान करण्यास सुरुवात केली. आता यावर लोकप्रिय अभिनेत्री गौहर खाननं राखीवरह टीका केली आहे. त्यासोबत तिच्या खासगी आयुष्यात काही स्टंट करण्यासाठी उमराचा वापर करू नकोस असं म्हटलं आहे.
गौहर खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. तिने ही स्टोरी शेअर करत सांगितले की कतारमधील एका धर्मादाय संस्थेने 20 अनाथ मुलांना उमराहसाठी कसे पाठवले. याशिवाय गौहरने राखीचं थेट नाव न घेता तिच्या मनात काय भावना आहे ते सांगितलं. 'भयंकर दिसणारी व्यक्ती अबाया घातल्याने मुस्लिम होत नाही,' असं तिनं सांगितलं.
दरम्यान, काही दिवसांपासून राखी सावंत ही सतत या प्रकरणात तिची बाजू मांडताना दिसत आहे. त्याशिवाय तिनं हा खुलासा केला की आदिलनं जबरदस्तीनं तिचा धर्म परिवर्तन केला आहे. हा दावा केल्यानंतर राखीनं तिच्या अनेक वेदनादायक कहानी सांगत सना खानसारखे बनून इस्लामिक संस्कृती अंगीकारायची होती, असे सांगितले.
हेही वाचा : बॉलिवूडचा ओरिजनल चॉकलेट बॉय, पहिल्या चित्रपटात अमिताभ बच्चनशी पंगा घेणारा हाच तो!
एका मुलाखतीत राखीनं याविषयी भावूक होत सांगितले की जेव्हा तिनं तिच्यासोबत झालेल्या सगळ्यांसोबत शेअर केला. राखीनं खुलासा केला की लग्नाच्या पाच महिन्यानंतर आदिलनं तिची खूप मारहान केली. तर आदिलनं जबरदस्ती तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. राखीच्या या वक्तव्यात किती सत्यता आहे हे कोणालाही माहित नाही. तर राखीनं केलेल्या या वक्तव्याच्या विरुद्ध आदिलनं वक्तव्य केलं आहे. आदिल आणि राखीमध्ये सुरु असलेला हा वाद टोकापर्यंत पोहोचला आहे.