`तुम्हीच माझे हिरो` गौहर खानची वडिलांसाठी भावूक पोस्ट
आज सकाळी गौहरच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : अभिनेत्री गौहर खानचे वडील अहमद खान यांचं निधन झालं आहे. वडिलांच्या निधनानंतर खान कुटुंबावर मोठं संकट आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात त्यांच्यासोबत गौहर देखील होती. परंतु ते नक्की कोणत्या आजाराने ग्रासले होते हे अद्याप कळू शकलेलं नाही, शुक्रवारी खुद्द गौहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या निधनाची बातमी दिली.
वडिलांच्या निधनाची बातमी सांगत तिने तिच्या वडिलांसाठी एक भावूक पोस्ट देखील केली आहे. 'माझे हिरो, तुमच्या सारखं कोणीही नाही. माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. मी तुमच्या सारखीच आहे.' अशी पोस्ट करत तिने #MyForeverShiningStar असं हॅशट्रग देखील दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. हा फोटो शेअर करत तिने ‘कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’ असे कॅप्शन दिले होते.