Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान दिवाळीसोबत त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख खानसाठी हा आठवडा सेलिब्रेशनचा आठवडा असणार आहे. शाहरुख खानसाठी 2024 हे खूपच खास आहे. कारण तो दिवाळीसोबतच वाढदिवस देखील मोठ्या पद्धतीने साजरा करणार आहे. हा वाढदिवस त्याचे कुटुंब कसा साजरा करते हे पाण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. हे पाहून मन्नत पाहण्यासाठी आलेले चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपल्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहते शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर जमतात. यावेळी देखील शाहरु खान त्याच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांचे आभार व्यक्त करणार आहे. 


शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त गौरी खानकडून पार्टीचं आयोजन


मीडिया रिपोर्टनुसार, गौरी खानने या वर्षी शाहरुख खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी आयोजित केली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या पार्टीसाठी गौरी खानने 250 पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केल आहे. गौरी खानने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर,सैफ अली खान, रणवीर सिंग, फराह खान, झोया अख्तर, अॅटली, अनन्या पांडे, करण जोहर, शनाया कपूर, नीलम कोठारी, शालिनी पासी आणि अशा इतर अनेकांचा समावेश आहे. 


शाहरुख खान करणार मोठी घोषणा


रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाची घोषणा करू शकतो. परंतु, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या घोषणेची चाहते देखील गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. त्यामुळे आता शाहरुख खान त्याच्या 59 व्या वाढदिवसाच्या निमित्त या चित्रपटाची घोषणा करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.