Gauri Nalawade : सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. अनेकांची दिवाळीची खरेदी झालीच असेल परंतु अद्यापही बाजारात ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत. सध्या अशाच एका अभिनेत्रीची बरीच चर्चा रंगलेली आहे. आपल्याला बाजारात असे अनेक गरीब, वयवृद्ध विक्रेते दिसतात ज्यांच्याकडे सुंदर सुंदर वस्तू असतात. अशाच एका बाजारात एक वयोवृद्ध आजी या पणत्या विकत होत्या. त्यांना पाहून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं जे केलं ते पाहून तुम्हीही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे त्यामुळे तिची विशेष चर्चा ही रंगलेली आहे. अनेक नेटकरी हे तिचे कौतुक करतानाही दिसत आहेत. ही अभिनेत्री आहे गौरी नलावडे. या अभिनेत्रीची सध्या जोरात चर्चा आहे. स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिन्मय उद्गीरकर तिचा हिरो होता. ही मालिकाही प्रचंड गाजली होती. त्यानंतर तिनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. सोशल मीडियावरही तिची प्रचंड चर्चा रंगलेली असते. यावेळी तिनं रस्त्यावर पणत्या विकणाऱ्या आजीबाईकडून पणत्या विकत घेतल्या आहेत. त्यातून कुठल्याही महागड्या दुकानात न जाता तिनं आजीबाईंकडून घेतलेल्या पणत्या पाहून सर्वांनीच तिचे चांगलेच कौतुक केले आहे. यावेळी ती आजीबाईंकडून या सर्व पणत्या विकत घेतल्या आहेत. खरेदी करताना तिनं यावेळी सुंदर अशी साडीही नेसली होती. हा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'तू माझा वापर केलास'; बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडेचं पती विकीसोबत कडक्याचं भांडण


यावेळी तिनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, ''यावर्षी दिवाळीत मी हाताने बनवलेल्या पणत्या खरेदी करण्यास प्राधान्य दिलं. आजी खूश, मी खूश…शुभ दीपावली!'' तिच्या या व्हिडीओखाली नाना तऱ्हेच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी शेअर केल्या आहेत. ''अंधारातून प्रकाशाकडे…त्या आजीला नक्कीच मदत झाली असेल'', ''छान अशा व्यक्तींची गरज आहे आज'', ''शेवटी आजीने 2 दिवे प्रेमाने दिले'' अशा काही कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.