Gautami Patil Wants To Get Married : लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासते. बऱ्याचवेळा तिच्या कार्यक्रमात राडे देखील होतात. तर अश्लील डान्स करते असं म्हणत अनेक लोक तिला ट्रोलही करतात. तर काही लोक तिचा कार्यक्रम बंद करा अशी मागणी करतात. पण तरी तिच्या चाहत्यांची लिस्टमध्ये रोजच्या रोज संख्या वाढत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौतमीनं पहिल्यांदा तिच्या लग्नाविषयी सांगितलं. इतकंच काय तर तिला कसा नवरा हवा आहे याचा खुलासा देखील तिनं केला आहे. (Gautami Patil Husband) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमीनं एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी मुलाखतीत बोलताना लग्नाविषयी आणि कसा नवरा पाहिजे याविषयी गौतमीनं खुलासा केला आहे. मी खूप खडतर आयुष्य जगलं आहे. माझं शालेय शिक्षण देखील मुलींच्या शाळेत झालं. माझ्या वडिलांचं लवकर निधन झालं. त्यांच्या निधनानंतर घरात कोणी पुरुष नव्हता. ना वडील, ना भाऊ, ना कोणी नातेवाईक. त्यामुळे माझा कधी कोणत्या पुरुषाशी तसा संबंध आला नाही. मी माझी आणि घरची जबाबदारी घेतली होती. आता सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्यानंतर माझ्या आयुष्यात एकतरी पुरुष असायला हवा असं मला वाटतं. त्यासाठी मला लग्न करायचं आहे' असं गौतमी म्हणाली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे कसा नवरा हवा याविषयी बोलताना गौतमी म्हणाली की, 'मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा यापैकी कशाचीही गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी 25 वर्षांची असून माझे लग्न झालेले नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे.' गौतमीवर सतत टीका होत असली तरी देखील तिच्या चाहत्यांच्या यादीत तरुणांची संख्या जास्त आहे. 


हेही वाचा : प्रिया बेर्डे यांनी Gautami Patil ला सुनावले खडे बोल, म्हणाल्या 'अशी गाणी आणि तमाशा चवीने...'


दरम्यान, गौतमीच्या डान्सवरून तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. आता गौतमीच्या शोला जाणाऱ्या लोकांवर लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेनं निशाणा साधला आहे. जो पर्यंत तिच्या शोला जाणं बंद करणार नाहीत, तो पर्यंत हे सगळं बंद होणार नाही. तर आम्ही कलाकारांनी किंवा मग राजकारणांनी कितीही काही केलं तरी हे थांबणार नाही असं त्या म्हणाल्या.