Heeramandi मधील रोमॅन्टिक गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, VIDEO आला समोर
Gautami Patli Dance On Heeramandi Song : गौतमी पाटीलनं हीरामंडीमधील गाण्यात दाखवल्या
Gautami Patli Dance On Heeramandi Song : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी:द डायमंड बाजार' या वेब सीरिजची चर्चा सुरु आहे. सीरिजमधील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ही गाणी जणू प्रेक्षकांना वेड लावत आहेत. या सीरिजमधील एक गाणं आहे ज्यानं सगळ्यांनाच वेड लावलं आहे. आता त्याच गाण्यावर लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलनं तिच्या कातिलाना अदा दाखवल्या आहेत. गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गौतमी पाटीलनं हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमी पाटीलनं 'चौधवी शब को कहा' या लोकप्रिय ठरलेल्या गाण्यावर तिची अदा दाखवली आहे. या व्हिडीओत गौतमीनं सुंदर अशी साडी नेसली आहे आणि मोत्यांचे झुमके आणि बांगड्या घातल्या आहेत. तिचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे गौतमीच्या अदांनी वेधले आहेत.
गौतमीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'एवढी कशी गोड आहेस यार. जीव ओवाळून टाकू वाटतंय तूझ्या वर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नवीन लूक छान दिसतेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गौतमी तू खूप चांगला डान्स केला आहेस आणि सुंदरही दिसतेस.' आणखी एक नेटकरी म्हणाला की, 'संजय लीला भन्साळीनं चुकीच्या अभिनेत्रींना कास्ट केलंय, मला असं म्हणायचंय की गौतमी मॅमकडे बघा... तू खूप टॅलेन्टेड आहेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप क्यूट, खूप देखणी दिसते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हीरामंडी'.
हेही वाचा : Photo : 'पंचायत 3' साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन!
हीरामंडी सीरिज विषयी बोलायचं झालं तर या सीरिजमधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आलम आणि ताजमध्ये दाखवण्यात आलेल्या या रोमॅन्टिक गाण्यानं सगळ्यांच्या मनाला भूरळ घातली आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीचे चाहते फॅन झाले आहेत. तर ही सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिति राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सहगल मेहतासोबत फरीदा जलाल, श्रुति शर्मा, ताहा शाह बदुशा, शेखर सुमन, फरदीन खान , जेसन शाह आणि अध्ययन सुमन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.