मुंबई : 'आपकी मुस्कुराहट पे मै जान भी दे दूँ....' असं दीपिकाचा स्मितहास्य असणारा चेहरा पाहून अनेकांनीच म्हटलं असेल. म्हणजे ती खऱ्या आयुष्यात रणवीरचं प्रेम असली तरीही मनातल्या मनात मात्र ती कित्येकांच्या हृदयावर राज्य करतेय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौंदर्य आणि व्यक्तीमत्त्वाच्या बाबतीत कायम उजवी ठरणाही ही अभिनेत्री जेव्हाही समोर येते तेव्हा एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. पण, आता मात्र हीच दीपिका ढसाढसा रडताना चाहत्यांच्या नजरेत आली आहे. 


घरातून आपण न आवरात निघतो, अगदी त्याच अवस्थेत ती या व्हिडीओमध्ये दिसत आहे. भावनांना मनात माजलेला काहूर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 


हतबलता तिच्या चेहऱ्यावरील अश्रूंवाटे बाहेर येत आहे. दीपिकाला असं पाहून नेमकं काय झालंय हाच प्रश्न चाहत्यांना पडत आहे. 


दीपिकाचं हे रुप समोर येण्याचं कारण ठरत आहे, तिच्या आगामी 'गहराईयाँ' या चित्रपटातील नवा व्हिडीओ. 


चित्रपटाचं टायटल साँग नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जिथं दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य या कलाकारांच्या नात्याची वेगळी आणि विचार करायला भाग पाडत आहे. 


प्रेम आणि नातं यांच्यामध्ये नेमकं कोणाला निवडावं या विवंचनेत असताना विश्वासघातानं दार ठोठावल्यावर नेमकं काय होतं, याची स्पष्ट झलक हे गाणं अवघ्या काही मिनिटांत दाखवत आहे. 



नात्यांची ही गुंतागुंत नेमकी कोणत्या वळणावर येऊन सुटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 11 फेब्रुवारीला हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.