मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा बऱ्याच काळानंतर अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. जेनेलिया तब्बल दहा वर्षांनी अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहे. ती शेवट रितेश देशमुखसोबत तेरे नाल लव हो गया या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने काही चित्रपटात काम केलं पण त्यात तिाचा कॅमिओ होता. आता जेनेलिया पुन्हा एकदा रितेशसोबत चित्रपटात दिसणार आहे. तिने तिच्या मिस्टर ममी या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया दोघेही प्रेग्नंट दिसणार आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनेलियाने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया दोघंही गरोदर दिसत आहेत. पोस्टरमध्ये जेनेलिया स्माईल देताना दिसत आहे. तर रितेश मात्र अस्वस्थ दिसत आहे. फर्स्ट लूक शेअर करत जेनेलियाने लिहिलंय की, एक ट्विस्टेड लाफ्टर राइड आणि अशी स्टोरी जी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. मनापासून हसायला सज्ज व्हा आणि पोट दुखेपर्यंत हसा.


जेनेलियाच्या या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट करून तिचं अभिनंदन करत आहेत. पोस्टवर कमेंट करूत चाहते सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल विचारत आहेत. एवढंच नाही तर जेनेलिया आणि रितेशला पुन्हा एकदा एकत्र बघून चाहते खूप खूश आहेत.


ही असणार सिनेमाची कहाणी
मिस्टर मम्मी या कॉमेडी ड्रामाची कॉमिक टायमिंग पाहण्यासारखी असेल. या चित्रपटाची कथा एका कपलभोवती फिरते ज्यांची विचारधारा मुलांच्या बाबतीत पूर्णपणे भिन्न आहे. 



मराठी सिनेमात देखील दिसणार
जेनेलिया 'वेद' या मराठी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाबाबत तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली होती. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे.