German Singer Cassandra Mae Spittmann Serenades Ram Aayenge song : उद्या अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सगळेच आतुर आहेत. सेलिब्रिटी तिथे जाणार असून अनेक गायक श्रीराम यांच्यावर गाणी गात आहेत. सगळेच सोशल मीडियावर गाणं शेअर करत त्यांचा आनंद शेअर करत आहेत. सगळ्यात जास्त चर्चा कोणाची रंगली असेल किंवा सगळ्यात जास्त लक्ष कोणी वेधलं असेल तर ती जर्मनची एक गायिका माय स्पिटमॅन आहे. तिनं 'राम आएंगे' हे गाणं गायलं असून सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे. खरंतर तिला अनेक लोक नळ्या डोळ्यांची गायिका म्हणून देखील ओळखतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माय स्पिटमॅननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती 'राम आएंगे' हे भक्ती गीत गाताना दिसत आहे. तिचं हे भक्ती गीत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत माय स्पिटमॅननं कॅप्शन दिलं की 'हे भजन तुमच्या सगळ्यांसाठी आहे. मला फक्त 22 तारखेच्या आधी तुमच्यापर्यंत हे गाणं पोहोचवायचं होतं. तर मला आशा आहे की तुम्हाला माझं व्हर्जन असलेलं हे गाणं आवडेल.' त्यासोबत तिनं विचारलं की 'तुम्ही सगळे 22 जानेवारी साठी किती उत्सुक आहात?' माय स्पिटमॅन विषयी बोलायचे झाले तर ती 21 वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 579K फॉलोवर्स आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, खरंतर एका नेटकऱ्यानं तिच्याकडे मागणी केली होती की ती 'राम आएंगे' हे भक्ती गीत गाऊ शकते का? त्यावर आनंदानं हो म्हणतं तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या सुंदर आवाजात माय स्पिटमॅननं तिचं 'राम आएंगे' गाण्याचं व्हर्जन शेअर केलं आहे. तिचा जो मधुर आवाज आहे त्यानं अनेकांना शहारे आले आहेत. तिनं 8 जानेवारी रोजी हे गाण शेअर केलं होतं. त्या व्हिडीओ आता पर्यंत 671K लोकांनी पाहिलं आहे. तर 82.5K लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. 


हेही वाचा : शाहरुख-सलमान ते रणवीर-दीपिका 'या' कलाकारांना मिळालं नाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण


माय स्पिटमॅनच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'भारता बाहेरचे लोक देखील इतके उत्सुक आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझं हिंदी खूप चांगलं आहे. हिंदीत इतका चांगला आवाज आणि मॉड्युलेशन अप्रतिम. तर खरंच हे अविश्वसनीय आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भारत आणि जर्मनीत असलेल्या संबंधांचे खूप चांगले प्रदर्शन आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'तिचं हिंदी खूप चांगलं आहे. देव तुला आशीर्वाद देओ.'