मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम नट्टू काका यांच्यावर या वयात तरी अशी वेळ यायला नको होती, असंच तुम्हाला वाटेल, कारण नट्टू काका हे एक ज्येष्ठ कलाकार आहेत, त्यांना अजून खूप काम करायचं आहे. पण नट्टू काका यांचं कुटूंब सध्या चिंतेत आहे. देशात कोरोना विषाणूच्या साथीमुळे बर्‍याच कंपन्यांची प्रकृती वाईट आहे. तर इंडस्ट्रीतील कंपन्या एकतर बंद झाल्या आहेत किंवा कर्मचार्‍यांना कमी पगार देत आहेत. याचा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर दोखील प्रभाव पडला आहे. गेल्या वर्षी बेरोजगारीमुळे अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी आत्महत्या केली. या वेळीही गेल्या वर्षीसारखीच परिस्थिती दिसत आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायानगरी मुंबईतील शूटिंग पूर्णपणे बंद
महाराष्ट्रात कोरोनाचं सर्वाधिक प्रमाण आहे. अशा परिस्थितीत मायानगरी मुंबईतील शूटिंग पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शूटिंग स्टुडिओ बंद आहेत. यांत छोट्या भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीकडे काम नसते आणि यामुळेच त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. 'तारक मेहता का उलटा चश्मा' मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणार्‍या घनश्याम नायक यांच्या बाबतीतही असंच  काहीसं घडलं आहे.


गेल्या एका महिन्यापासून घरी
नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ते गेल्या एक महिन्यापासून घरी आहेत. शूटिंगसाठी पुन्हा त्यांना कधी बोलावले जाईल किंवा शोमधील त्यांचे पात्रांचं शूट कधी कधी सुरू होईल हे देखील त्यांना माहिती नाही. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे शोचे शूटिंग पूर्णपणे बंद झालं आहे.


मार्चमध्ये शेवटचे शूट
घनश्याम नायक म्हणाले, "मार्चमध्ये मी या मालिकेतचा शेवटचा एक एपिसोड शूट केला. तेव्हापासून मी घरी आहे. वयामुळे त्यांचे कुटुंब त्याच्याबद्दल काळजीत असल्याचेही ते म्हणाले. म्हणून त्यांनी असं ही सांगितलं की, माझं वय जास्त असल्या कारणांनं मला घराबाहेर जाण्यास मनाई केली आहे. पण मला सेटवर यायला आवडेल.


निर्मात्यांसह अनेक कलाकार संक्रमित
गेल्या महिन्यात शोचे निर्माता असित कुमार मोदी आणि या शोमध्ये गोलीची भूमिका साकारणारा कुश शाहसोबत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता सर्व काही ठीक आहे मात्र मुंबईत शूटिंग थांबल्यामुळे कोणीही सेटवर परत येऊ शकला नाही.