GHKKPM: या मालिकेतील दीर-भावजयचा रोमान्स पाहून लोक भडकलेत, राग काढला या अभिनेत्रीवर
Gum Hai Kisike Pyaar Meiin Update: आजकाल टीव्ही मालिका `गम है किसी के प्यार में` च्या (GHKKPM) कथेत जबरदस्त ट्विस्ट येत आहे.
मुंबई : Gum Hai Kisike Pyaar Meiin Update: आजकाल टीव्ही मालिका 'गम है किसी के प्यार में' च्या (GHKKPM) कथेत जबरदस्त ट्विस्ट येत आहे. या मालिकेत अनेक वर्षे झाल्यानंतर कथा पूर्णपणे बदलली आहे. सई गेल्याबरोबर पाखीचा मार्ग मोकळा झाला आणि आता ती विराट याची पत्नी झाली आहे. तेव्हापासून पाखीचा रंगही खूप बदलला आहे. ती आता चव्हाण कुटुंबाची आवडती सून बनली आहे आणि सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. तीही तिचा पूर्ण वेळ आपल्या मुलाला देते. पण विराटच्या हृदयात अजूनही सई आहे. मात्र घरच्यांच्या आग्रहापुढे नमते घेत विराटही पाखीसोबतचे नाते पुढे नेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
विराट पाखी हनिमूनला जाणार
अलीकडेच, शोचा एक नवीन प्रोमो आला आहे, ज्यामध्ये विराटने पाखीला त्यांचे नाते नव्याने सुरु करण्यास सांगितले आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर लोकांचा संताप उसळला आहे. विराट आणि पाखीला जवळ आणण्यासाठी भवानी दोघांनाही हनिमूनला पाठवण्याचा निर्णय घेते. 'गम है किसीके प्यार में लेटेस्ट एपिसोड' या (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Latest Episode) मालिकेच्या कथेत विराट आणि पाखी लवकरच हनीमूनला जाणार आहेत.
लोकांनी का केले ट्रोल
'गम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या कथेतील हा ट्विस्ट चाहत्यांना आवडलेला नाही. याच कारणामुळे पुन्हा एकदा 'गम है किसी के प्यार में' या मालिकेच्या चाहत्यांनी निर्मात्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती अशी बनली आहे की, लोक आता नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हिला थेटपणे सुनावत आहेत. शोमधील भावानीच्या या रोमान्सने टीव्ही कॉरिडॉरमध्ये खळबळ उडवून दिली आहे.