Ghoomer Trailer : बहुप्रतीक्षित आर. बाल्की दिग्दर्शित 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आणि सोशल मीडियावर या ट्रेलरनं तुफान लोकप्रियता मिळवली. मोठ्या संख्येने लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेयर तर केला पण अनेक बड्या क्रिकेटर ने हा खास ट्रेलर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या क्रिकेटर्सनं त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे.


कोण आहेत ते क्रिकेटर्स?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, आणि अजिंक्य रहाणे आणि इतर बड्या क्रिकेटरर्सनं आर. बाल्की दिग्दर्शित चित्रपटाच्या ट्रेलर त्यांचा सोशल मीडियावर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.  


सौरव गांगुलीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रेलरचे कौतुक केले आणि म्हणाले, 'माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक.. अभिषेक.. ट्रेलर शानदार दिसत आहे.. चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.. प्रत्येकाने बघावा असा एक चित्रपट ! सगळ्या कलाकार आणि क्रू ला शुभेच्छा 



वीरेंद्र सेहवाग म्हणाले 'मी फिरकीपटूंना कधीच गांभीर्याने घेतले नाही पण हा स्पिनर नक्कीच खास दिसतोय. चित्रपट पाहण्याच्या प्रतिक्षेत आहे.



युवराज सिंगनेही ट्रेलरचं कौतुक केले आणि पोस्ट शेअर करत म्हटले की, 'ऑल द बेस्ट... चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे!'



आकाश चोप्रा म्हणाले, 'हे छान आहे चित्रपट पाहण्यासाठी वाट बघू शकत नाही'. 



हर्षा भोगले ट्विटरवर म्हणाले, 'घूमर या नवीन चित्रपटाबद्दल खूप उत्साही आहे. केवळ बाल्की नावाच्या एका मित्राने तो बनवला आहे म्हणून नाही तर ती इतकी धाडसी कल्पना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी अभिनेता आणि क्रिकेटरची गरज आहे. ते पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' 



अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राशिद खाननेही इन्स्टाग्रामवर हा ट्रेलर शेअर केला. 'घूमरचा ट्रेलर आवडला. आता चित्रपट पाहण्याची प्रतिक्षा आहे. मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे की ती शेवटची डिलिव्हरी कशासाठी होती! अभिनंदन' 



'घूमर' मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर प्रमुख भूमिकेत आहेत तर शबाना आझमी आणि अंगद बेदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दिग्गज अभिनेते  अमिताभ बच्चन कॉमेंटरच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवेंद्र सिंग आणि इवांका दास यांच्याही या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.