नवी दिल्ली : सोशल मीडियामुळे जगभरातील तरूणांना आपलं टॅलेंट जगासमोर आणण्याची संधी निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेत काही तरूण-तरूणी आपले डान्स व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत असतात. असाच एका तरूणीचा धमाकेदार डान्स व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा आणि सनी सिंह यांच्या आगामी ‘सोनू के टीटू की स्विटी’चे आत्तापर्यंत दोन गाणी रिलीज झाली आहेत. दोन्ही गाण्यांना हनी सिंहने आवाज दिलाय. यातील ‘छोटे छोटे पेग लगा’ हे गाणं अधिकच लोकप्रिय ठरलं आहे. याच गाण्यावर सध्या तरूणाईचे व्हिडिओ समोर येत आहेत. 



या व्हिडिओत एका तरूणीने धमाकेदार डान्स केलाय. DeepaDance या यूट्य़ूब चॅनेलने हा व्हिडिओ अपलोड केलाय. या तरूणीच्या डान्सला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. आत्तापर्यंत १४४,६६० इतक्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियातून हा व्हिडिओ शेअरही होत आहे.