हत्यारासहीत सलमानच्या घरात घुसून तरुणीचा धिंगाणा
अभिनेता सलमान खानच्या घरात घुसून एका तरुणीनं चांगलाच धुडगूस घातल्याचं समोर येतंय.
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरात घुसून एका तरुणीनं चांगलाच धुडगूस घातल्याचं समोर येतंय.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमानच्या घरात एक तरुणी हत्यारासहीत जबरदस्तीनं दाखल झाली. इतकंच नाही तर आपण आत्महत्या करणार असल्याची धमकीही द्यायला तीनं सुरुवात केली.
सलमानच्या घरात सुरक्षाव्यवस्था चोख नसल्यानं हा प्रकार घडला. याच गोष्टीचा फायदा घेत तरुणी सलमानच्या घरात घुसली.
ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर सिक्युरिटी गार्डनं तिला थांबवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण, सलमान आपला पती आहे आणि आपल्याला त्याला भेटायचंय असं म्हणत ती घरात घुसलीच आणि घराच्या छतावरदेखील पोहचली.
सिक्युरिटीनं जेव्हा या तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली.
या तरुणीनं घातलेल्या धिंगाण्यामुळे सिक्युरिटीला फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं.