Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत आहे. हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री लहाणपणीच खुप सुंदर दिसायची. फोटोतली ही  चिमुकली मुलगी आता मोठी होऊन बॉलिवू़डची दिग्गज अभिनेत्री बनली आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अनेक सिनेमात काम केले आहे. तिचे हे सिनेमे हिट देखील ठरले होते.


दरम्यान या अभिनेत्रीने बॉलिवूडच्याच एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. हा सुपरस्टार अभिनेता एका पाठोपाठ एक सिनेमे करत असतो.त्याचे हे सिनेमे हिट देखील ठरत असतात. या कलपला दोन मुले देखील आहेत. आणि आता ही मुले मोठी देखील झाली आहे. 


ही आहे अभिनेत्री?


जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, फोटोत दिसणारी छोटी मुलगी दुसरी कोणी नसून ट्विंकल खन्ना (twinkle khanna) आहे. ट्विंकल खन्ना ही डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी आहे. ट्विंकल ही बॉलिवूडचा मेगास्टार अक्षय कुमारची पत्नी आहे. ट्विंकलच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोला खूप पसंती दिली जात आहे. डिंपलने मातृदिनानिमित्त हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो आता व्हायरल होत आहे.  cinemaofindiaofficial नावाच्या इन्स्टा पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.


ट्विंकल खन्नाने (twinkle khanna) बरसात, बादशाह, मेला इत्यादी बॉलीवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, नंतर अक्षयसोबत (Akshay kumar) लग्न केल्यानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले. ट्विंकल खन्नाला (twinkle khanna) लिहिण्याची आवड आहे. यासोबतच तिचे नाव बॉलीवूडच्या बिंदास अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. जी कोणत्याही मुद्द्यावर आपले मत निर्दोषपणे व्यक्त करते.