भावाला रागाने बघणाऱ्या `या` चिमुकलीला ओळखलंत का? आजची बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री
कमी वयात काम सुरू करून अभिनेत्रीने जिंकल साऱ्यांचं मन
मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी ट्रेंड होत असतात. बॉलिवूड कलाकार अनेकदा सोशल मीडियावर आपले जुने फोटो शेअर करत असतात. आणि एकमेकांचे बालपणीचे फोटो शेअर करून ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. असाच बॉलिवूडमधील नंबर १ असलेल्या अभिनेत्रीने आपला फोटो पोस्ट केलाय. आता अभिनेत्रीला ओळखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत.
या फोटोत ही तरूणी आपल्या भावाला रागाने बघत आहे. ही अभिनेत्री लहानपणी अतिशय सुंदर आणि गोड दिसत आहे.
ही अभिनेत्री आहे Genelia D'souza. जेनेलियाने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.
फादर्स डे च्या दिवशी 'हॅप्पी फादर्स डे' च्या शुभेच्छा दिल्या आहेत. युझर्सने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. क्यूट, ब्युटीफुल, सुंदर फोटो...
Genelia D'souza हिंदी प्रमाणेच तमिळ, मराठी आणि तेलुगु सिनेमांमध्येही झळकली आहे. जेनेलियाने १५ व्या वर्षी रितेशसोबत 'तुझे मेरी कसम' सिनेमात काम केलंय. जेनेलिया आणि रितेश या सिनेमानंतर प्रेमात पडले. दोघांनी लग्न केलं. आज या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहे.