मुंबई: अनेक बॉलिवूड स्टार त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करतात. आणि त्यांच्या आयुष्यातील खुशाली चाहत्यांना कळवत असतात. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदासाठी इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. श्वेता नंदासाठी अमिताभ यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुली खूप खास असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. मुलगी श्वेताची पहिली कादंबरी 'पॅराडाइज टावर्स' सर्वोत्तम विक्रीच्या कादंबरींमध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेतावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 'मुलीला अशा प्रगती पथावर पाहणे हे एका वडीलांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. मुली खरचं खास असतात. 'घूंघट' से लेकर 'बेस्ट सेलर' बनने तक.' 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अमिताभ यांनी श्वेता नंदाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये श्वेता लाल ओढणीमध्ये दिसत आहे. श्वेताने तिचे पुस्तक वडीलांच्या ७६ व्या वाढदिवसाचे निमीत्त साधत प्रकाशित केले होते. कादंबरीकार होण्याव्यतिरिक्त श्वेताने फॅशन जगतातही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. डिजाइनर मोनिशा जयसिंग सोबत तिने फॅशन लेबल एमएक्स लॉन्च केले आहे.


अमिताभ लवकरच सून ऐश्वर्या राय बच्चन सोबत झळकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मणिरत्नमच्या सिनेमात सासरे-सून एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचे लेखण मागील तीन वर्षांपासून सुरु आहे, हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. सिनेमा कल्कि कृष्णमूर्ति यांच्या 'पोन्नियिन सेलवन' वर आधरलेला आहे. ही कादंबरी 'अरुल्मोझीवर्मन'ची गोष्ट सांगत आहे.