Shakira Tax Fraud: दहा वर्षांपुर्वी 'वाक्का वाक्का' या जगप्रसिद्ध गाण्याने जनमानसात लोकप्रिय झालेली शकीरा आता मात्र मोठ्या अडचणीत आली आहे. गेली वीस वर्षे ती आपल्या पॉप गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेते आहे. आजपर्यंत तिने संगीत क्षेत्रात मोठा रेकॉर्डही केला आहे. तिच्या गाण्यांचे रेकॉर्ड 80 लाखांच्याही वर विकले गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात सर्वात पॉप्यूलर गायिका म्हणून ओळखली जाणारी शकीरा आता मात्र वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. तिच्यावर टॅक्स फ्रॉडचा आरोप आहे. स्पॅनिश सरकारच्या नियमांचे पालन न केल्याने शकीराला 8 वर्षांचा तुरूंगवास होण्याची शक्यता आहे. सरकारच्या पाहणीनुसार शकीराने 2012 ते 2014 या कालावधीत आलेल्या कमाईतला म्हणजेच 1.45 करोड युरो अर्थात भारतीय रूपयांमध्ये 117 करोड रूपयांचा टॅक्स पे केला नसल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. 


या गुन्ह्यासंदर्भात कोर्टाने शकीराला कॉर्टाच्या बाहेर म्हणजे आऊट ऑफ कॉर्ट सेटलमेंट करण्याचा सल्ला दिला होता परंतु ही गोष्ट शकीराने धुडकावून लावली. शकीराने केलेल्या वक्तव्यानुसार असे समोर येते की तिने असा कोणताच गुन्हा केला नसून सरकारच्या कोणत्याच नियमांचा भंग केला नाही तसेच आजपर्यंत शकीरा आपले काम हे निष्ठापुर्वक करत आली आहे आणि याबाबतीतही तिने कोणतीच हलगरजी केली नसल्याचे तिने सांगितले आहे.


स्पॅनिश tax officers च्या म्हणण्यानुसार शकीरा तिच्या प्रियकरापासून विभक्त झाल्यानंतर 2011 साली स्पेनमध्ये आली होती परंतु तिने कर भरण्यासाठी Paper वर 2015 पर्यंत बहामासमध्ये आपले राहण्याचे ठिकाण सांगितले होते. शकीराच्या टीमकडून बुधवारी एक निवेदन जाहीर केले ज्यामध्ये तिने स्पॅनिश tax officers वर त्यांच्या अधिकारांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचा आणि आपल्या अधिकारांचा अपमानास्पद पद्धतींने अवलंब केल्याचा आरोप केला. स्पेनची रहिवासी नसतानाही tax officers शकीराची संपत्ती आपली असल्याचा दावा करत आहेत. यात शकीराच्या इंटरनेशनल टूरचा आणि अमेरिकेतील रिअॅलिटी शोची जज म्हणून मिळालेल्या फीचा समावेश आहे. ही बाबही शकीराने निवेदनातून स्पष्ट केली आहे.  


समोर आलेल्या माहितीनुसार शकीराला अद्याप कॉर्टाची तारिख मिळालेली नाही. त्यात तिने आपल्यावर गुन्हा अमान्य केला आहे तसेच तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने सगळा टॅक्स हा पे केला असून त्यात तीन मिलियन यूरोचा व्याजही समाविष्ट आहे.