नवी दिल्ली : हॉलिवूड चित्रपट 'द गॉडफादर पार्ट  II'मध्ये कॅरमाइन रोजेटो ही भूमिका साकारणारे कॅरमाइन कॅरिडी यांचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे आहे. अनेक दिवसांपासून ते कोमामध्ये होते. सेडार्स-सिनाई रुग्णालयात त्यांचे मंगळवारी निधन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅरमाइन कॅरिडी यांनी सेडार्स-सिनाई रुग्णालयात मंगळवारी दुपारनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉलिवूड टेलिव्हिजन, चित्रपटसृष्टीत त्यांनी सहा दशकांपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कॅरमाइन कॅरिडी यांनी 'द गॉडफादर पार्ट  II'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने हॉलिवूडमध्ये दुख: व्यक्त केले जात आहे. 



'द गॉडफादर' हा हॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट ठरला आहे. आजही या चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. कॅरमाइन कॅरिडी यांच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या जाण्याने हॉलिवूडमध्ये एका उत्तम कलाकाराला मुकलो असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.