मुंबई : आमिर खानची एक्स पत्नी आणि चित्रपट दिग्दर्शक किरण राव पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात उतरली आहे. किरण चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची ही दुसरी वेळ आहे. 11 वर्षांपूर्वी किरणने 'धोबी घाट' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'धोबीघाट'प्रमाणेच अभिनेता आमिर त्याच्या 'आमिर खान प्रॉडक्शन' हाऊसच्या बॅनरखाली किरण राव दुसरा चित्रपट बनवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा आमिरने 'धोबीघाट'ची निर्मिती केली आणि त्यात महत्त्वाची भूमिका साकारली. त्यावेळी त्यांचं पती-पत्नीचं नातं होतं. पण आमिर आणि किरण यांचा काहि महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. दोघांनी गेल्या वर्षी 13 जुलै रोजी एकमेकांपासून घटस्फोटाची घोषणा केली होती. या घोषणेसोबतच दोघांनीही पूर्वीप्रमाणेच मित्र राहू आणि यापुढेही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये काम करत राहू, असे निवेदनही जारी केले होते.


किरण दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग ८ जानेवारीपासून महाराष्ट्रातील विविध भागात सुरू झालं आहे. हा एक सामाजिक विनोदी चित्रपट आहे, ज्यामध्ये स्पर्थ श्रीवास्तव तीन मुख्य पात्रांपैकी एक मुख्य पात्र साकारत आहे. 'जामतारा: सबका नंबर आएगा' या वेब सीरिजमध्ये स्पर्थ श्रीवास्तवने मुख्य भूमिका साकारली होती आणि याशिवाय तो 'बालिका वधू' या मालिकेतही दिसला आहे.


स्पर्थ श्रीवास्तव व्यतिरिक्त प्रतिभा रत्न आणि नितांशी गोयल देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रतिभाने झी टीव्हीवरील 'कुर्बान हुआ' या मालिकेत काम केलं आहे, तर नितांशी 'पेशवा बाजीराव' या मालिकेत दिसली होती. चित्रपटाच्या सेटशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, चित्रपटाचे शूटींग कोरोनामुळे सर्व मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन केलं जात आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केला जात नाहीये.


चित्रपटाचे लेखन बिप्लव गोस्वामी यांनी केलं आहे, तर चित्रपटाची पटकथा स्नेहा देसाई यांनी लिहिली आहे. चित्रपटाची गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली असून चित्रपटातील गाणी संगीतबद्ध करण्याची जबाबदारी राम संपत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.