मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो गेली पाच वर्षे आपलं मनोरंजन करताना दिसत आहे. त्यामुळे या शोची सर्वत्र चर्चा आहे. या शोमधून आपल्यासमोर 'शिवाली, भोवली, अवली, पावली कोहली' ही पात्रं आली आणि त्यांच्या स्किटनं आपल्या सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. या मालिकेतून आपलं मनोरंजन करण्यासाठी हे चारही जणं पुरता धुमाकूळ घालत असतात. अभिनेता प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या फॅन फॉलोईंगमध्येही बरीच वाढ झाली आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिनं सुबोध भावेसोबत नुकत्याच 'फुलराणी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकने आपला वाढदिवसही खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र यावेळी अभिनेत्रीने स्वत:ला एक गिफ्ट दिलं आहे. याचेच काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकतीच प्रियदर्शनीने एक नवी गाडी घेतली आहे. ज्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


हे फोटो शेअर करत प्रियदर्शनीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, २३.०८.२३   New member added to the family!वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत”…त्या सर्वांना ‘Thank you’! आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन !PS - या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7 … IS THE WINNER !



तर अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी फायर आणि हार्ट ईमोजी शेअर करत तिला शुभेच्छा दिल्य आहेत. प्रसाद ओक यांनी कमेंट करत Proud of you असं म्हटलंय तर, शिवाली परब हिने  Heyyyyy congratulations priii and welcome igloo अशी कमेंट केली आहे. तर ओकांर राऊतने तिच्या या फोटोवर अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर ओंकारच्या कमेंटवर एकाने लग्न करून टाक तिच्याशी असं म्हटलंय. तर अजून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय, विकू नका..नाहीतर फॅमिली मेंबर विकला लिहावं लागेल.. तर अजून एकाने लिहीलंय, कशाला घेतली एकदम कमकुवत व असुरक्षित आहेत suzuki च्या गाड्या तर अनेकांनी अभिनंदन प्रियदर्शनी असं लिहीलंय. प्रियदर्शनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.