मुंबई : दिवंगत लोकप्रिय पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवालाची आई चरणकौर सिंह मार्च महिन्यात मुलाला जन्म देणार आहे. सिद्धू मूसेवालाची आई एका खास तंत्राद्वारे मुलाला जन्म देणार असल्याची बातमी सध्या समोर येत आहे. सिद्धू मूसवालाचे काका चमकौर सिंह यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. सिद्धू मोसेवाल्याच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. २०२२ साली भर रस्त्यात गायकावर गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली होती.  सिद्धू मूसवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटूबीयांनाही मोठा धक्का बसला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरत सिद्धू मूसवालाची आई आयव्हीएफव्दारे एका बाळाला जन्म देणार आहे. सिद्धूच्या आईने आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भधारणेचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समजताच त्याचे चाहते कमालीचे आनंदात आहेत. तर अनेकजण सिद्धू पुन्हा येणार असल्याचं म्हणत आहेत. अशी बातमी आहे की, पुढच्याच महिन्यात सिद्धू मुसेवालाची आई पुन्हा एकदा आई होणार आहे.  सिद्धूची आई मार्च महिन्यात एका मुलाला जन्म देणार आहे. ही माहिती समोर येताच सिद्धूच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.


नुकतेच सिद्धू मुसेवालाच्या काकांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप सिद्धू मुसेवालाच्या आई वडिलांनी या बातमीवर मौन बाळगलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव  त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.  प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मूसवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर री गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसवाला यांच्या हत्येसाठी महिंद्रा बोलेरो आणि टोयोटा कोरोला या दोन मॉडेल्सचा वापर करण्यात आला होता. 


सिद्धू मोसेवालाच्या हत्येचा केला गेला होता प्लान
दिल्ली पोलिसांनी सिद्धू मूसेवालाची हत्येला घेवून दावा केला आहे की, हत्येआधी ६ हत्यारे १५ दिवसांत ८ वेळा सिद्धू मुसेवालाच्या घरी गाडी आणि त्याच्या रुट्सची रेकी केली होती. मात्र या ८ वेळा मुसेवालची हत्या करु शकले नाही कारण मूसेवाला बुलेट प्रूफ कार आणि लैस कमांडोसोबत बाहेर पडायचा. त्याच्या हत्ये दिवशीदेखील गोळीबार करणाऱ्यांच्या दोन्ही वाहनांमध्ये खूपसारी शस्त्रे आणि हँण्ड ग्रेनेड होते. त्याच्या हत्येनंतर त्याचा चाहत्यांमध्ये खूप नाराजी पसरली होती