मुंबई : उर्मिलाने आपल्या चाहत्यांना आनंदवार्ता दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिला आदिनाथ कोठारे हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उर्मिलाच्या प्रेग्नेंसीबाबत सर्वच चाहत्यांना उत्सुकता होती. कोठारे कुटुंबात लवकरच गोड बातमी समजणार होती. त्यामुळे उर्मिला, आदिनाथ आणि महेश कोठारे यांचे फॅन्स आतुरतेने या गोष्टीची वाट पाहत होते. आणि नुकतीच आदिनाथ कोठारे यांनी ही बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. 



लग्नाच्या सहा वर्षांनी आई झाली उर्मिला...


उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे. 20 डिसेंबर 2011 रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या 6 वर्षांनी उर्मिला आई होणार आहे. उर्मिलाच्या कुटुंबाने नुकतेच बेबीशॉवर सेलिब्रेट केले होते.


उर्मिला गरोदरपणातही सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव्ह होती.  तिच्याबद्दल सर्व माहिती फॅन्सला वेळोवेळी देत असे. उर्मिलाचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यात ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसली होती.आता उर्मिलाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर झाले आहेत. या नव्या पाहुण्याच्या स्वागताची सध्या जोरदार तयारी कोठारे कुटुंबात सुरू आहे.


या दिवसांत उर्मिलाने योगा देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. तसेच तिचे बेबी शॉवरचे फोटोशूट देखील तिने चाहत्यांसाठी शेअर केलं होतं. त्यामुळे या गोड बातमीची उत्सुकता साऱ्यांनाच होती.