मुंबई  :  टॉम हँक्स (Tom Hanks) आणि त्याची पत्नी रिटा विल्सन (Rita Wilson) यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यांनी फक्त आत्मविश्वासाच्या  बळावर कोरोनासारख्या धोकादायक आजारावर मात मिळवली आहे. कोरोनावर योग्य ते उपचार घेवून ते पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एंजलिस येथील घरी परतल्याची बातमी चाहत्यांना कळवली आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने हँक्स आणि रिटा दोघे ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते. तेथे त्यांना करोनाची लागण झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांना सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. यामुळे दोघांनी जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची चाचणी केली. दोघांच्या शरिरात कोरोनाने शिरकाव केला असल्याचं चाचणीतून स्पष्ट झालं होतं.  ६३ वर्षीय अभिनेत्याने कोरोना व्हायरसकरता लागणारे सर्व उपचार आपण घेत असल्याचं सांगितलं होतं.



हँकने सोशल मीडियावरून सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. चीनमधून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगभरात कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. 


चीनच्या वुहान शहरात उदयास आलेलं हे धोकादायक वादळ अद्यापही शमलेलं नाही. दिवसागणिक या विषाणूचा उद्रेक कमी होताना दिसत नाही.  आतापर्यंत चीनसह इतर ९० देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे.