मुंबई : आवाजांचा बादशाहा मोहम्मद रफी यांची आज (रविवार, 24 डिसेंबर) 93वी जयंती. त्यांच्या गायकीची आणि लोकप्रियतेची जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलनेही दखल घेतली आहे. गुगलने रफी साहेंबांचे खास डूडल बनवून खास आदरांजली व्यक्त केली आहे.


फकीराकडून मिळाली गाण्याची प्रेरणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद रफी यांचा जन्म पंजाब येथील कोटला सुल्तान सिंह गावात एका मध्यमवर्गीय मुस्लिम परिवारात झाला. तो दिवस होता 24 डिसेंबर 1924. कदाचित वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल पण, रफी साहेबांना गाण्याची प्रेरणा एका फकिराकडून मिळाली होती. असेही सांगण्यात येते की, मध्यमवर्गिय कुटुंबात जन्मलेल्या रफी साहेबांच्या भावाचे केशकर्तनालयाचे (सलून) दुकान होते. लहानपनी रफी साहेबांचा सर्वाधीक वेळ हा त्या दुकानातच जात असे. तेव्हा त्यांचे वय साधारण 7 वर्षांच्या आसपास असेल. भावाच्या दुकानात एक फकीर नेहमी येत असे. त्याच्या गाण्याची लकब काही औरच होती. ज्याने रफी साहेबांना भूरळ घातली. असेही सांगतात की आवाजाच्या मोहापाई रफी साहेब त्या फकीराचा पिच्छा करायचे. पुढे पुढे रफी साहेबांची गाण्यातील ऋची वाढली. त्यांनी गायला सुरूवात केली. सुरूवातीचा काही काळ ते त्या फकिरालाच कॉपी करायचे. पण, नंतर त्यांना स्वत: सूर गवसला. गावतील लोकही त्याला दाद देऊ लागले.


उस्तादांकडून घेतले गायनाचे धडे


त्यांच्या आवाजातील खासियत आणि गाण्यावरचे प्रेम पाहून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना गायनाचे धडे देण्याचे ठरवले. मग त्यांनी लाहोर येथे उस्ताद उब्दुल वाहिद खान यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. सोबतच त्यांनी गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगिताचेही धडे घेतले.


1944मध्ये बॉलिवूडमध्ये एण्ट्री


रफी साहेबांनी वयाच्या 13 व्या वर्षी जाहीर गायला सुरूवात केली. एकदा श्रोत्यांमध्ये गाणे ऐकायला बसलेल्या श्याम सुंदर यांना रफींचे गाणे आवडले. त्यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. रफी साहेबांनी श्याम सुंदर यांच्या संगित दिग्दर्शनात 'सोनिये नी हिरीये नी' हे पहिले गाणे गायले. या गाण्यात त्यांना जीनत बेगम यांची साथ मिळाली. हे गाणे पंजाबी चित्रपट गुल बोलच साठी गायले. तर, 1944 मध्ये त्यांनी नौशाद यांच्या संगित दिग्दर्शनाखाली 'हिंदुस्तान के हम है पहले आप के लिये गाया' हे गाणे गायले. 


मोहम्मद रफी यांनी पार्श्वगायनात आपली खास जागा निर्माण केली. 31 जुलै 1980मध्ये या जादूभऱ्या आवाजाला देश आणि चाहते मुकले. त्यांचे निधन झाले. मात्र, आजही जुन्या आणि नव्या पिढितही मोहम्मद रफी साहेबांची गाणी आवर्जून ऐकणारे लोक तुम्हाला सर्ऱ्हास सापडतील.