मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा 90 (Govinda) च्या दशकातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. 1988 मध्ये गोविंदाचा 'हत्या' (Hatya) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाची कथा एका राज नावाच्या लहान मुलाची होती, जो योगायोगानं गोविंदाला भेटतो आणि मग ते मुलगा गोविंदाचं सगळंकाही होतो. खरंतर तुम्हाला माहितीये का राजाची भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकाराचे नाव सुजीता आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात भूमिका साकारली तेव्हा सुजिता ही 5 वर्षांची होती. आज हीच सुजिता (Sujithar) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला सुजिता ही दाक्षिणात्य चित्रपटातील एक मोठं नाव आहे. तो अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसला आहे. 2021 मध्ये, सुजितानं 'मास्टर' चित्रपटाच्या मल्याळम आवृत्तीसाठी मालविका मोहननसाठी डबिंग देखील केलं. 12 जुलै 1983 रोजी त्रिवेंद्रम, केरळ येथे जन्मलेल्या सुजितानं तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सुजितानं आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दमदार अभिनय केला आहे.



'पांडियन स्टोअर्स'मधील सुजिताच्या धनम या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच 'हरिचंदनम' या मालिकेतील उन्निमायाच्या भूमिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. सुजीतानं चित्रपट निर्माता धनुषसोबत लग्न केले आहे. ती सध्या चेन्नईत राहते आणि तिला एक मुलगा असून धनविन असे त्याचे नाव आहे. सुजीता अनेक टीव्ही शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे.